वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal Tar Vachal Essay In Marathi Best 100 Words

Vachal Tar Vachal Nibandh In Marathi: शिक्षणामुळेच माणूस आपले जीवन सुरक्षित आणि यशस्वी करू शकतो. बाबासाहेबांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले कारण शिक्षणाशिवाय व्यक्तीची प्रगती आणि स्वातंत्र्य शक्य नाही. या पोस्टमध्ये आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘वाचाल तर वाचाल’ या संदेशावर निबंध लेखन केलेले आहे.

Vachal Tar Vachal Essay In Marathi

[मुद्दे : डॉ. आंबेडकरांनी केलेला उपदेश – अशिक्षित व्यक्ती स्वत:चे नुकसान करून घेते – इतर लोक त्यांना फसवतात – पिळवणूक होते – अंधश्रद्धा – शिक्षिताला कोणी फसवू शकत नाही- सुशिक्षित पालक आपल्या पाल्याची योग्य काळजी घेतात – जग पुढे चालले आहे.]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच दलित-पीडित, गरीब, अशिक्षित, दीनदुबळ्या जनतेला हा संदेश दिला होता- ‘वाचाल तर वाचाल!’ माणूस शिकला नाही; अशिक्षित राहिला की, त्याची सगळीकडून फसवणूक होते. जमीनदार, सावकार हे सगळे त्याची पिळवणूक करतात. तो सर्वांचा गुलाम होतो.

अशिक्षित माणूस चुकीच्या कल्पना मनात बाळगतो. त्याचे बाळ आजारी पडले, तर त्याला दृष्ट लागली, नजर लागली, असे तो मानतो. साप-विंचू चावला वा कुठली रोगराई आली, तर योग्य औषधोपचार न करता तो वैदू भगत, गंडा, दोरा असे उपाय करत राहतो.

शिकलेला माणूस आपली योग्य प्रगती करू शकतो. दुसरा कोणीही त्याची पिळवणूक करू शकत नाही, योग्य प्रकारे शिक्षण घेतलेल्या माणसाला योग्य वेतन क्यावे लागते. शिकलेले आईवडील आपल्या मुलांना कधीच अशिक्षित ठेवणार नाहीत. ते त्यांचे योग्य संगोपन करतात. आज सारे जग पुढे जात आहे. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की, वाचाल (शिक्षण घ्याल) तर वाचाल (टिकून राहाल)!

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की तुम्हाला  ‘वाचाल तर वाचाल निबंध/Vachal Tar Vachal Marathi Nibandh लेखन आवडले असेल. शिक्षणामुळे माणूस आत्मनिर्भर होतो आणि जीवनातील अडचणींवर मात करू शकतो. जर हा निबंध आवडला असेल, तर कृपया शेअर करा.

Leave a Comment